शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा जि.प.त ई-टेंडरिंग गाजली

By admin | Updated: March 23, 2016 00:29 IST

हिंगोली : जि.प.च्या अर्थसंकल्पीय सभेत सुरुवातीला अनुपालनावर झालेल्या चर्चेनंतर पुन्हा एकदा ई-टेंडरिंगवरून अधिकारी व जि. प. सदस्यांनी नियमांचा किस पाडला.

हिंगोली : जि.प.च्या अर्थसंकल्पीय सभेत सुरुवातीला अनुपालनावर झालेल्या चर्चेनंतर पुन्हा एकदा ई-टेंडरिंगवरून अधिकारी व जि. प. सदस्यांनी नियमांचा किस पाडला. तरीही त्यात नेहमीचेच प्रश्न व तीच उत्तरे ऐकायला मिळाली.जि.प.च्या जागांवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यांना यात कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचे सीईओंनी सांगितले. तीन लाखांच्या कामांनाही ई-निविदा करण्यासाठी जि.प.च्या बांधकाम विभागाकडून सक्ती केली जात असल्याचा मुद्दा मुनीर पटेल, संजय दराडे, विनायक देशमुख यांनी मांडला. त्यावर तसे होणार नाही. तीन लाखांपेक्षा अधिक रकमेला ई-निविदा करावी लागते, असे कार्यकारी अभियंता भगत यांनी सांगितले. तर समाजकल्याणच्या मुद्यावरही ग्रामपंचायतच निविदा काढणार आणि तेच निविदा प्रक्रियेत सहभाग घेणार हे कसे? असा सवाल सदस्यांनी केल्यावर त्यावर उत्तर नव्हते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जि.प.च्या रस्त्यावर कामासाठी मागितलेली ना-हरकत फेटाळण्यात आली. जि.प.सुद्धा ही कामे करायला सक्षम यंत्रणा असल्याने याच विभागाकडून कामे करावीत, असे आमचे म्हणने आहे. शिवाय साबांने मान्यता मिळेल, हे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे मत सदस्यांनी मांडले. त्यात शेवटी उपाध्यक्षांनी मी व सीईओ यात आपल्याला विश्वासात घेवून निर्णय घेतो, असे म्हणाले. मुनीर पटेल यांनी सिद्धेश्वरचे पाणी कॅनॉलला सोडण्याचा ठराव घेण्याची मागणी करून गरज पडल्यास जि.प.ने पैसे भरावे मात्र पाणी सोडल्यास या भागातील टंचाईची दाहकता कमी होईल, असे सांगितले. तसा ठराव घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्याचे ठरले. त्यानंतर कृषी विभागाकडून सौरदिव्यांची निविदा अंतिम झाल्यानंतर त्यात सौरदिव्यांचे दर कमी झाल्याने आता १८९00 ऐवजी १३४४0 या दराने दिवे खरेदीस मान्यता देण्यात आली. यात निविदा अंतिम झाल्यानंतर कार्यारंभ आदेश दिला. साठ टक्के कामही झाले. त्यानंतर दीड महिन्यांनी दर कमी झाल्याचे सांगून संबंधित कंत्राटदाराकडून लेखी घेतले. याला दुसऱ्यांदा मान्यता कशी व एवढ्या दिवसांनंतर का? असा सवाल गजानन देशमुख यांनी केला. यात सभागृहाची दिशाभूल होत असल्याचा आरोपही करण्यात आला. तर गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेला कापडसिंगीच्या आरोग्य केंद्राचा मुद्दाही गाजला. कालबाह्य वाहने निर्लेखित करण्यासाठी तांत्रिक तपासणी करून घेण्याच्या अटीवर मंजुरी दिली. तसेच दलित वस्ती सुधार योजनेतील ३८ कामांमध्ये बदल करण्यासही मंजुरी देण्यात आली.