शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

वामकुक्षी पडली महागात; भरदुपारी उघड्या घरातून पाच लाखाचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 2:54 PM

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना तायडे कुटुंब झोपेतून उठताच त्यांना कपाट उघडे दिसले. त्यांनी कपाट पाहिले असता त्यांतील दागिन्यांची बॅगच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ठळक मुद्देआरोपी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

औरंगाबाद : सिडको एन २ येथील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी भरदुपारी पाच लाखाचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची शुक्रवारी घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार सिडको एन २ मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश काेंडू तायडे (६२) यांनी शुक्रवारी दुपारी पत्नी आणि सुनेसह जेवण केले. यानंतर त्यांची सून रूममध्ये जाऊन आराम करीत होती. तर तायडे हे त्यांच्या पत्नीसह समोरच्या खोलीत दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी पडले. यावेळी त्यांच्या घराच्या हॉलचा मुख्य दरवाजा आणि स्वयंपाक खोलीचे दार उघडे होते. ते झोपलेल्या हॉलमध्येच कपाट होते. या कपाटाला त्यांनी लॉक केले नव्हते. हॉलमध्ये असलेल्या तायडे दाम्पत्याला डोळा लागला आणि त्यांचा घात झाला. याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात तनिष्कच्या बॅगेत ठेवलेले ४ लाख ९६ हजार ४२३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची बॅगच चोरट्यांनी पळविली.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना तायडे कुटुंब झोपेतून उठताच त्यांना कपाट उघडे दिसले. त्यांनी कपाट पाहिले असता त्यांतील दागिन्यांची बॅगच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांची सून आणि पत्नीला या घटनेचा धक्काच बसला. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे, उपनिरीक्षक अमोल म्हसके आणि गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रमेश तायडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदतायडे यांच्या घरातून दागिन्यांची बॅग चोरून नेणारी संशयित महिला एन २ येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. या कॅमेऱ्याचे फुटेज पाहून पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. उघड्या घरातून मोबाईल, पैशाचे पाकीट चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या महिलेने ही चोरी केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी