शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ तारा रहिवाशांच्या घरावर

By admin | Updated: August 22, 2014 01:00 IST

बीड : शहरातील हनुमान नगर, नाथ नगर या परिसरात विद्युत तारा रहिवाशांच्या घरावर आल्या होत्या. यासंदर्भात वारंवार मागणीही केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते.

बीड : शहरातील हनुमान नगर, नाथ नगर या परिसरात विद्युत तारा रहिवाशांच्या घरावर आल्या होत्या. यासंदर्भात वारंवार मागणीही केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. यानंतरही सदरील तारा दुरुस्त करण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. परिणामी बुधवारी झालेल्या वाऱ्या-पावसात या तारा तुटल्या व नागरिकांच्या घरावर पडल्या. नागरिकांनी सावधगिरी बाळगल्याने सुदैवाने काही हानी टळली.बीड शहरातील हनुमान नगर, नाथ नगर, बार्शी नाका, शाहुनगर, शनि मंदिर गल्ली आदी भागात नागरिकांच्या घराजवळून विद्युत तारा गेलेल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे अनेक ठिकाणी या तारा घरांना चिकटलेल्या आहेत. काही ठिकाणी सावधगिरी म्हणून केवल छोटासा पाईपचे या तारांना आवरण घातलेले आहे. यामुळे काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सदरील तारा घरापासून दूर करण्याची मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे. असे असतानाही याची दखल वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांतून घेतली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या व्यथा ‘लोकमत’ने ८ आॅगस्ट रोजी मांडल्या होत्या. यानंतरही सदरील तारा दुरुस्त करण्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी बुधवारी सायंकाळी झालेल्या वाऱ्यासह पावसाने या तारा तुटल्या. अनेक ठिकाणच्या तारा तुटून त्या नागरिकांच्या घरावर तर कोठे घरामध्ये, रस्त्यावर पडल्या. सदरील प्रकार वेळीच रहिवाशांच्या लक्षात आल्याने अनुचित घटना टळली. यानंतरतरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी भागवत वाघमारे, पद्मीण बामणे, महादेव लाड, भागवत डोईफोडे, महादेव बनसोडे, किशोर लोखंडे यांनी केली आहे. तारा दुरुस्त करू-लटपटेया संदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे म्हणाले की, मी मुंबई येथे आहे, काय प्रकार झाला आहे, याची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो. विद्युत तारा नागरिकांच्या घरावर तुटल्या असतील तर त्या तात्काळ दुरुस्त केल्या जातील, असेही ते म्हणाले. आता आंदोलन करणारतारा हटविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यासाठी आता आंदोलन करणार असल्याचे सुनीता बनसोडे, हरिबाई बामणे, प्रियंका वाघमारे, पद्मीण वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)