औरंगाबाद : महानगरपालिका आयुक्त प्रकाश महाजन यांना सोमवारी शासनाने अखेर आयुक्तपदावरून दूर केले. त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिनाभरापूर्वीच सर्वसाधारण सभेत महाजन यांच्याविरुद्ध बहुमताने अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. सेवानिवृत्तीला अवघे ४५ दिवस शिल्लक असताना महाजन यांच्यावर ही कारवाई झाली आहे. त्यांची सेवा सामान्य प्रशासन विभागाकडे परत करण्यात आली आहे. महाजन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून मनपातील शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता. २० आॅक्टोबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत तो ९५ विरुद्ध १३ मतांनी मंजूर झाला.काँग्रेस वगळता सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. एकूण सदस्यांच्या पाच अष्टमांशपेक्षा जास्त मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्यास आयुक्तांना शासनाने परत बोलवावे, अशी तरतूद मनपा अधिनियमातील कलम ३६(३) मध्ये आहे. या अधिनियमनाच्या आधारे नगरविकास विभागाने सोमवारी सायंकाळी उशिरा महाजन यांना आयुक्तपदावरून दूर करण्याचे आदेश जारी केले. त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.तसेच महाजन यांची सेवा सामान्य प्रशासन विभागाकडे परत करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. उपसचिव गो. आ. लोखंडे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी झाले आहेत. आयुक्तांविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करून घेण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनीही विशेष लक्ष घातले होते.प्रस्तावाला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी एमआयएमचे स्थानिक आमदार इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली होती. सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला झालेल्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी एमआयएमने आधीची भूमिका बदलत ठरावाच्या बाजूने मतदान केले.
अखेर मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची उचलबांगडी
By admin | Updated: November 17, 2015 00:35 IST
औरंगाबाद : महानगरपालिका आयुक्त प्रकाश महाजन यांना सोमवारी शासनाने अखेर आयुक्तपदावरून दूर केले. त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अखेर मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची उचलबांगडी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}