‘लर्निंग लायसन्स’च्या परीक्षेत नापास होण्याची भीती? अशी करा तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:00 IST2025-01-16T17:59:29+5:302025-01-16T18:00:02+5:30

अभ्यास न करताच परीक्षा दिली तर परत द्यावी लागेल चाचणी

Afraid of failing the 'Learning License' exam? Prepare like this, avoid 'these' mistakes | ‘लर्निंग लायसन्स’च्या परीक्षेत नापास होण्याची भीती? अशी करा तयारी

‘लर्निंग लायसन्स’च्या परीक्षेत नापास होण्याची भीती? अशी करा तयारी

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात न जाता आता अगदी घरी बसून ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळविता येत आहे. मात्र, पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने या परीक्षेत नापास होऊन लर्निंग लायसन्स मिळण्यापासून अनेक जण मुकत आहेत.

आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ पद्धतीने आरटीओ कार्यालयाच्या विविध सेवा दिल्या जात आहेत. यात राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली. यामुळे विनाएजंट लर्निंग लायसन्स मिळविणे शक्य झाले आहे.

लर्निंग लायसन्ससाठी इन कॅमेरा ऑनलाइन परीक्षा
लर्निंग लायसन्ससाठी इन कॅमेरा ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. आधार कार्डवरील उमेदवाराचा फोटो ओळखूनच चाचणी सुरू होते. चेहऱ्याची मूळ ठेवण जुळली तरच चाचणी देता येते.

नापास होण्याची कारणे काय?
घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देताना इकडेतिकडे पाहिल्यास म्हणजे स्क्रीनवरून नजर हटल्यास नापास अथवा निकालच जाहीर न होण्याचा प्रकार होतो. परीक्षा देणाऱ्याच्या पाठीमागून इतर कोणी गेल्यासही निकाल जाहीर होत नाही.

ऑनलाइन परीक्षेसाठी असा करा अर्ज
सारथी परिवहन संकेतस्थळावरून लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो. अर्ज करून, विहित शुल्क भरून, परीक्षा देऊन शिकाऊ परवाना मिळतो.

परीक्षा देताना काय काळजी घ्याल?
परीक्षेदरम्यान इकडेतिकडे पाहू नये. इकडेतिकडे पाहिल्यास नापास होण्याची अथवा निकाल राखीव ठेवला जाण्याची शक्यता असते. मग, आरटीओ कार्यालयात जावे लागते. परीक्षेपूर्वी आधार कार्डवरील फोटो अपडेट करून घ्यावा. चेहरा जुळला नाही, तर परीक्षा देता येत नाही.

वाहतूक नियमांचा अभ्यास करावा
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी उमेदवारांनी वाहतूक नियमांचा अभ्यास करावा. ऑनलाइन पद्धतीने घरूनही चाचणी देता येते. ही चाचणी देताना इकडेतिकडे पाहू नये. परीक्षा देणाऱ्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला परीक्षा देताना कॅमेऱ्यामध्ये येऊ देऊ नका. शिवाय जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर अर्ज करून आरटीओ कार्यालयातही चाचणी देता येते.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Afraid of failing the 'Learning License' exam? Prepare like this, avoid 'these' mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.