शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी एआरसी सेंटरवर अ‍ॅडमिशन कीट

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांमधील मान्यताप्राप्त ७४ इन्स्टिट्यूटमधील तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपासून

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांमधील मान्यताप्राप्त ७४ इन्स्टिट्यूटमधील तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्याअंतर्गत शहरातील १२ अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) अ‍ॅडमिशन कीट विक्रीला प्रारंभ झाला.मराठवाड्यात १० शासकीय आणि ६४ खाजगी शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आहेत. या संस्थांमध्ये तीन वर्षे कालावधीचे पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. या संस्थांमध्ये २६ हजार ९४६ विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत २७ जून ते ६ जुलै या कालावधीत अ‍ॅडमिशन कीटची विक्री करण्यात येत आहे. आज शहरातील १२ एआरसी सेंटरवर अ‍ॅडमिशन कीट खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही गर्दी केली होती. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये कीटची किंमत आहे. या कीटसाठी आॅनलाईन मराठवाड्यातील एकूण विविध अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट (एआरसी) सेंटरवर अ‍ॅडमिशन कीट खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती. अ‍ॅडमिशन कीटसोबत विद्यार्थ्यांना एक युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आला आहे. त्याआधारे विद्यार्थ्यांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागेल.त्यानंतर ७ जुलै रोजी तात्पुरती मेरिट यादी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. ८ आणि १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन फॉर्ममधील त्रुटी दुरुस्त करता येतील. त्यानंतर १२ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. त्याआधारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांत १४ ते १७ जुलैदरम्यान पसंती फॉर्मनुसार महाविद्यालयांची नावे देण्यात येतील. त्या महाविद्यालयात १९ जुलैपर्यंत त्यांना रिपोर्टिंग करणे अनिवार्य असेल.त्यानंतर दुसरी आणि तिसरी प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. शेवटची प्रवेश फेरी ही कौन्सिलिंग पद्धतीची असून, ती आॅगस्टमध्ये राबविण्यात येणार आहे. ७४ संस्थांमध्ये २६ हजार ९४६ जागामराठवाड्यात तंत्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम शिकविणाऱ्या १० शासकीय आणि ६४ खाजगी शिक्षण संस्थांचे पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आहेत. या संस्थांमध्ये २६ हजार ९४६ विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो. जास्तीत जास्त जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी संस्था प्रयत्नशील आहेत.