शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचाही समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 15:55 IST

यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे.

ठळक मुद्दे विभागीय आयुक्तांच्या जटवाडा शाळा भेटीमुळे जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सध्या आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संपूर्ण जि. प. शाळांच्या तपासणीची मोहीम सुरू आहे. शाळा तपासणी दरम्यान अनेक जि. प. शाळांतील मुलांना धड लिहिता येत नाही आणि वाचताही येत नसल्याचे पथकातील अधिका-यांच्या निदर्शनास आले आहे.

औरंगाबाद : विभागीय आयुक्तांच्या जटवाडा शाळा भेटीमुळे जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सध्या आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संपूर्ण जि. प. शाळांच्या तपासणीची मोहीम सुरू आहे. शाळा तपासणी दरम्यान अनेक जि. प. शाळांतील मुलांना धड लिहिता येत नाही आणि वाचताही येत नसल्याचे पथकातील अधिका-यांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्या प्राधिकरणाने शंभर टक्के शिक्षकांसाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांना हमखास वाचायला येईल, असे नियोजन केले आहे. 

तथापि, यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असून यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. कमी गुण मिळणा-या शिक्षकांचे वेतन कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता निर्माण करण्यासाठी शिक्षकांसमोर अध्ययन- अध्यापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणावर भर दिला आहे. शिक्षकांनी मुलांना समजेल असे शिकवावे, मुलांच्या भाषा शिक्षकांना समजली पाहिजे, यासाठी शिक्षकांनी मुलांकडूनच निदान दैनंदिन व्यवहारातील वापरापुरती त्यांची भाषा शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये असलेली आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल. शिक्षक आपल्याकडून शिकतात, याचे कौतुक मुलांना वाटेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल. परिणामी, मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होईल, अशी भावना विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे यांनी व्यक्त केली. 

विद्या प्राधिकरणाच्या सभागृहात जिल्ह्यातील १२८ केंद्रप्रमुखांसाठी ‘मूलभूत वाचन क्षमता विकास’ या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. यापुढे १२ डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शंभर टक्के शिक्षकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना लिहायला- वाचायला येईल, यासाठी शिक्षकांना वाचन विकास टप्पे, बहुभाषिक, भिन्न भाषिक, मुलांसाठी अध्यापनाचे तंत्र, जेवढी पटसंख्या तेवढे कृती आराखडे, गाणी, गोष्टी, संवाद, चित्रवाचन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

पायाभूत चाचण्यांचा निकालपायाभूत चाचण्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात विद्या प्राधिकरणाचे डॉ. सुभाष कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोर्टलवर पायाभूत चाचण्यांचा निकाल आतापर्यंत ५० ते ५२ टक्के एवढाच अपलोड झालेला आहे. पायाभूत चाचण्यांचा निकाल शंभर टक्के अपलोड झाल्याशिवाय संकलित मूल्यमापन चाचणीचा निकाल पोर्टलवर भरता येत नाही. शंभर टक्के निकाल अपलोड झाल्यावर जिल्ह्यातील कोणत्या शाळेचा किती निकाल लागला आहे, किती विद्यार्थी मागे आहेत, हे कळेल.