शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!

By admin | Updated: September 19, 2014 01:01 IST

बीड : जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या तुलनेत पुढे असून ते कमी करण्यासाठी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘फोकस’ केला आहे़ बालमृत्यूची कारणमिंमासा

बीड : जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या तुलनेत पुढे असून ते कमी करण्यासाठी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘फोकस’ केला आहे़ बालमृत्यूची कारणमिंमासा शोधण्यासाठी युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ़ खनिंद्र भियान हे बुधवारी बीडला आले़ गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला कालबद्ध ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना दिल्या़माता व बालकांच्या आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी २२ ते २८ जून २०१४ यादरम्यान केंद्र शासनाच्या युनिसेफमधील डॉ़ अजय पटले बीडमध्ये आले होते़ त्यांनी येथील आरोग्यसुविधांची पाहणी करुन अहवाल राज्याच्या प्रधानसचिवांसह संचालकांकडे दिला़ राज्यात एक हजार मुलांमागे २५ मुलांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे़ मात्र, बीड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे तब्बल ३४ मुलांचा मृत्यू होतो़ त्यामुळे बीडमध्ये अधिक प्रभावी उपायांची गरज आहे़ बालमृत्यू कमी करण्यासाठी डॉ़ खनिंद्र जिल्ह्यात दाखल झाले़ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याशी चर्चा केली़ जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकगुरुवारी सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ़ खनिंद्र भियान यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली़ यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, आरोग्य सुविधांत सुधारणांचे प्रयत्न सुरु आहेत़ मात्र, बालविवाह, स्थलांतर, गरिबी, अज्ञान हे इथले बेसिक प्रश्न आहेत़ त्यामुळे एकीकडे सामाजिक सुधारणांबरोबरच आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत़ बालमृत्यू रोखण्यासाठी ‘कॉल टू अ‍ॅक्शन’ हा कार्यक्रम सुरु करण्याची सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिली़ (प्रतिनिधी)