शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST

वाळूज महानगर : वाळूज परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत वादळी चर्चा होऊन विविध विकास कामांसंदर्भात ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आले

वाळूज महानगर : वाळूज परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत वादळी चर्चा होऊन विविध विकास कामांसंदर्भात ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आले. बहुतांश ठिकाणी ग्रामसभेत नागरिकांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करून त्यांना धारेवर धरले. या ग्रामसभेत गोंधळातच विविध ठराव संमत करण्यात आले.जोगेश्वरीजोगेश्वरी येथे आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण दुबिले तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, उपसरपंच मंगलबाई नीळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर नीळ, माजी सरपंच योगेश दळवी, नजीरखाँ पठाण आदींची उपस्थिती होती.या ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आमचं गाव-आमचा विकास कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रतीक्षा यादीत नसलेल्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०१७-१८ चा कृती आराखडा तयार करण्यात आला. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. गावातील जि.प. शाळेत इयत्ता दहावीपर्यंत वर्ग सुरू करणे, विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या शाळा जोगेश्वरीत स्थलांतरित करणे, आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण, ईदगाह व कब्रस्तानच्या असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारून सुशोभीकरण इ. विषयी चर्चा करण्यात आली.या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ काजळे, पंडित पनाड, कलीम शहा, सूर्यभान काजळे, ज्ञानेश्वर कर्डीले, ज्ञानेश्वर कर्डीले, सुनील वाघमारे, विलास नरवडे, सुरेश सरोदे, हरिदास चव्हाण, रमेश सोनकांबळे, सोनू लोहकरे, छाया बोंबले, कल्याण साबळे, काशीनाथ भावले, भास्कर दुबिले आदींची उपस्थिती होती.वडगाव वडगाव येथे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश भोंडवे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, उपसरपंच हौसाबाई पाटोळे आदींची उपस्थिती होती. आमचं गाव-आमचा विकास या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बजाजनगरातील थकीत कराचा मुद्दा चांगलाच गाजला. कडक कारवाई करून कर वसुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. ग्रामसभेला श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, सचिन गरड, मंदा भोकरे, वैशाली जिवरग,श्रीकृष्ण भोळे, कृष्णा साळे, सुनील काळे, प्रकाश निकम, परमेश्वर मदन, जितू दहातोंडे, प्रा. विलास पठारे आदींची उपस्थिती होती.