अकोट , दि. २१- शहरातील विविध भागांत उघड्यावर शौच करणार्या पाच जणांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस सूत्रानुसार, शहरातील विठ्ठल राऊत, विनोद बोडखे रा. बर्डे प्लॉट, अंकुश नेमाडे रा. रामटेकपुरा, शंकरराव धुराटे रा. कराळे प्लॉट, चेतराम अंभोरे हे गुड मॉर्निंग पथकाला २१ मार्च रोजी सकाळच्या दरम्यान उघड्यावर शौच करताना दिसून आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}