समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:40 IST2025-07-18T19:40:00+5:302025-07-18T19:40:40+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथून आरोपीला पकडले 

Accused in the shooting incident at the Savagi toll booth on the Samruddhi Highway arrested | समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत

समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत

फुलंब्री : समृद्धी महामार्गावरील सांवगी येथील टोल नाक्यावर ११ जुलै रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपी करण भालेराव याला स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नेवासा येथून अटक केली. गोळीबाराच्या तब्बल ७ दिवसांनंतर भालेरावला पोलिसांच्या हाती लागला. त्याला फुलंब्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने पिस्तुल कोठून व कसे आणले याचा तपास सुरु आहे.

करण सोनिनाथ भालेराव व भरत विजय घाटगे ( राहणार सांवगी) हे सांवगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर काम करत. एका खोलीत बसलेले असताना करण भालेरावने पिस्तुल काढले तेव्हा भरत घाटगे याने पिस्तुल नकली असल्याचे म्हंटले. यावरून करण याने पिस्तुलचे बटन दाबले असता गोळी थेट भरत घाटगेच्या पोटात घुसली. यानंतर करण भालेराव फरार झाला.

दरम्यान, फरार आरोपी करण प्रवरा संगम ( तालुका नेवासा ) येथे नातेवाईकांच्याकडे लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि पवन इंगळे ,जमादार वाल्मिक निकम, महेश बिरुटे ,चालक गणेश ढाकणे यांचे पथक गुरुवारी रात्रीच त्या ठिकाणी पोहचले. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण भालेराव नेवासा फाटा येथे आला असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. करण याला फुलंब्री पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Accused in the shooting incident at the Savagi toll booth on the Samruddhi Highway arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.