कामगाराचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:39 IST2019-06-13T22:38:56+5:302019-06-13T22:39:10+5:30
दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात ४७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ घडली.

कामगाराचा अपघाती मृत्यू
वाळूज महानगर : कामाला येत असताना दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात ४७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ घडली. अनिल भास्करराव आहेरवाल (४७, रा. तुर्काबाद खराडी) असे मृताचे नाव आहे.
अनिल आहेरवाल हे वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी सकाळी तुर्काबाद खराडी येथून दुचाकीवर औरंगाबाद-नगर महामार्गाने वाळूज एमआयडीसीत कामाला येत होते.
कामगार चौकाजवळ आले असता सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान दुचाकी रस्त्यावरुन घसरली. यात ते बेशुद्ध पडले. शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अनिल यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.