वाळूज येथे मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:11 IST2018-08-03T18:06:07+5:302018-08-03T18:11:06+5:30

दुचाकी व ट्रकच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा आज पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. घनश्याम वासुदेव आघाव (२३ ) असे मृताचे नाव असून तो बकवालनगर (ता.गंगापूर) येथील रहिवासी होता. 

Accidental death of Merchant Navy officer at Walle | वाळूज येथे मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

वाळूज येथे मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : दुचाकी व ट्रकच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा आज पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. घनश्याम वासुदेव आघाव (२३ ) असे मृताचे नाव असून तो बकवालनगर (ता.गंगापूर) येथील रहिवासी होता. 

या विषयी अधिक माहिती अशी की, घनश्याम आघाव हा इराण येथे मर्चंट नेव्हीत आॅफीसर म्हणुन नोकरीस होता. ८ जुलै रोजी तो सुटी घेऊन आपल्या मुळगावी बकवालनगर येथे आला होता. गुरुवारी रात्री औरंगाबाद-नगर महामार्गावर दुचाकीवरून (एम.एच.२० डी.क्यु.१३५९ ) तो घराकडे निघाला. रात्री ९ वाजेच्या दरम्यान बजाज आॅटो कंपनीजवळ त्याला पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ( क्रमांक एम.एच.-१९, झेड.१२६८ ) जोरदार धडक दिली. यात घनश्यामचा डावा पाय निकामी होऊन तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला. यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा आज पहाटे मृत्यू झाला. 

Web Title: Accidental death of Merchant Navy officer at Walle