शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासोबत अपघात विमा

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत असतानाच बँकेकडून संबंधित शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमाही उतरविला जात आहे, अशी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून यंदा ९,८६३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. आतापर्यंत त्यापैकी २५ टक्के म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले होते. सध्या विभागातील आठही जिल्ह्यांत कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पण हे पीक कर्ज देत असतानाच बँकांकडून शेतकऱ्यांचा अपघात विमाही उतरविला जात आहे. याविषयी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. ते म्हणाले, पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमा उतरविला जातो आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे १५ रुपये आणि बँकेचे १५ रुपये असा ३० रुपये खर्च येतो. याशिवाय पीक कर्ज देताना पीक विमाही उतरविला जात आहे. शेतात किती क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड करणार याविषयी शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तेवढी रक्कम काढून घेतली जात आहे. नंतर ही पीक विम्यासाठी संबंधित बँक किंवा एजन्सीकडे जमा केली जाते. गतवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर असा पीक विमा उतरविण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा मराठवाड्यासाठी पीक विम्याच्या भरपाईपोटी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सध्या या रकमेचेही वाटप सुरू आहे. बँकांमधून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. तसेच पीक विम्याच्या भरपाई रकमेतून जुन्या कर्जाचा हप्ता कापून घेऊ नका अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. खरिपासाठी सध्या राज्यभरात पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. या कर्ज वाटपात औरंगाबाद जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९ टक्के इतके पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे, असेही वाकडे म्हणाले.