शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

शिवा ट्रस्टच्या फार्मसी कॉलेजला मान्यता द्या

By admin | Updated: July 7, 2014 00:41 IST

औरंगाबाद : शिवा ट्रस्ट संचालित राजेशभय्या टोपे कॉलेज आॅफ फार्मसी, निपाणी, भालगाव आणि वडाळा येथील प्रतिभाताई पवार कॉलेज आॅफ फार्मसी यांना पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता द्या.

औरंगाबाद : शिवा ट्रस्ट संचालित राजेशभय्या टोपे कॉलेज आॅफ फार्मसी, निपाणी, भालगाव आणि वडाळा (ता. श्रीरामपूर) येथील प्रतिभाताई पवार कॉलेज आॅफ फार्मसी यांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देऊन महाविद्यालयांची नावे संकेतस्थळावर टाका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांनी राज्य शासनाला दिले.शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी सदर संस्थेने आॅल इंडिया तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांच्याकडे फार्मसी पदविका कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. एआयसीटीईने दोन्ही कॉलेजांना औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. वडाळा येथील कॉलेजसाठी १२० प्रवेश क्षमता, तर निपाणी येथील कॉलेजची प्रवेश क्षमता १८० अशी निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयानेही हा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी शिफारशीसह सादर केला. राज्य शासनाने बृहत आराखड्याच्या निकषांच्या आधारे दोन्ही संस्थांना मान्यता देण्यास नकार दिला. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी अ‍ॅड. व्ही.डी. होण यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, एआयसीटीई ही सर्वोच्च संस्था आहे. शासनाची केवळ नाममात्र मान्यता असते. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. शासनाच्या वतीने सहायक सरकारी लोकअभियोक्ता एस.के. तांबे यांनी काम पाहिले.