शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

बँकांवर राहणार एसीबीची नजर

By admin | Updated: June 10, 2016 23:42 IST

हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले.

हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले.जिल्हा कचेरीतून सभागृहात झालेल्या बैठकीस जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, सीईओ मधुकर आर्दड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९६८.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे असल्याचे सांगण्यात आले. सध्या १३ हजार शेतकऱ्यांचे ६८ कोटींचे पुनर्गठन झाले. केवळ १७ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक अपेक्षित कर्जवाटप करीत नसल्याचा मुद्दा समोर आला. या दोन्ही बँकेची आर्थिकस्थिती चांगली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र ती चांगली असल्याचे समोर असल्याचे कर्ज वाटपाचा आदेश दिला. राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांची कर्जवाटपाचा टक्का कमी आहे. त्यांनी व इतर सर्व बँकांनी २० जूनपर्यंत कर्जवाटप पूर्ण न केल्यास कठोर कारवाईचा आदेशही त्यांनी दिला.पीककर्जासाठी सर्च रिपोर्टचा मुद्दा आ. मुंदडा यांनी उपस्थित केला. त्यावेळी कुणीही फेरफार अथवा सर्च रिपोर्ट मागू नये. असे आदेशित केले तर दलालांच्या सुळसुळाटाबाबत आ. मुटकुळे यांनी आरोप केला होता. तर आ. वडकुते यांनी सेनगावात २०० शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवूनही कर्ज वाटप झाले नसल्याचा आरोप केला.हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अ‍ॅक्सीस, आयसीआयसीआय आदी खाजगी बँका पीककर्ज अजिबात देत नाहीत, अशीही सर्वात्रिक तक्रार होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी या बँका येथे व्यवसाय करत असतील तर त्यांनी कर्ज दिलेच पाहिजे, असे ठासून सांगितले. अन्यथा परवाना रद्द करू, असे बजावले.आमदार घेणार मेळावेपीककर्ज वाटपाचे काम गतिमान होण्यासाठी सर्व आमदार तालुक्याला बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्जमेळावे घेतील, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. यापूर्वी त्यांनी चावडी बैठका घेतील, असे सांगितले होते. तसा प्रकार यावेळी झाला तर शेतकऱ्यांनी कर्ज मिळणे दुरापास्तच आहे. कारण दुष्काळ मदतीचे २० ते २५ कोटीचे वाटप अजून बाकी आहे.(जिल्हा प्रतिनिधी)