रोपांच्या बीलासाठी १ हजाराची लाच स्वीकारली; चिंचोली लिंबाजी येथील वनपाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:26 IST2021-01-27T16:26:12+5:302021-01-27T16:26:36+5:30

तक्रारदार यांचे रोपांचे व खतांचे बिल काढून देण्यासाठी म्हणून दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

ACB arrested Wanpal by accepting a bribe of Rs. One thousand at Chincholi Limbaji | रोपांच्या बीलासाठी १ हजाराची लाच स्वीकारली; चिंचोली लिंबाजी येथील वनपाल एसीबीच्या जाळ्यात

रोपांच्या बीलासाठी १ हजाराची लाच स्वीकारली; चिंचोली लिंबाजी येथील वनपाल एसीबीच्या जाळ्यात

कन्नड- येथून जवळच असलेल्या चिंचोली लिंबाजी येथे सामाजिक वनीकरण विभाग कन्नडचे वनपाल यांना एक हजाराची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. भगवान कौतिकराव मगर असे आरोपी वनपालाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नडचे वनपाल भगवान कौतिकराव मगर यांनी तक्रारदार यांचे रोपांचे व खतांचे बिल काढून देण्यासाठी म्हणून दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने चिंचोली लिंबाजी येथे सापळा रचून एक हजार रुपयांची लाच घेताना मगर यांस रंगेहाथ पकडले. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार,उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शुभांगी सुर्यवंशी, पोना बाळासाहेब राठोड, पोकॉ राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांनी हि कारवाई केली. पिशोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: ACB arrested Wanpal by accepting a bribe of Rs. One thousand at Chincholi Limbaji