शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची गैरहजेरी; धान्य मालाची आवक घटली

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना : पावसाने दडी मारल्यामुळे जालना बाजापेठेत सर्व प्रकारच्या धान्य मालाची आवक मंदावली आहे.

जालना : पावसाने दडी मारल्यामुळे जालना बाजापेठेत सर्व प्रकारच्या धान्य मालाची आवक मंदावली आहे. धान्यमालासोबतच किराणा मालाच्या दरातही तेजी सुरू झाली आहे. सोने, चांदीच्या दरात जास्त चढ उतार नाही, मात्र ग्राहकी मंदावली आहे.पावसाच्या गैरहजेरीचा थेट परिणाम जालना बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात आता जाणवू लागला आहे. एरव्ही दररोज सरासरी दहा हजार पोत्यांची आवक असणाऱ्या बाजारपेठेत सध्या सर्व प्रकारच्या धान्याची आवक जेमतेम ४०० ते ५०० पोती इतकीच आहे. गव्हाच्या दरात ५० रूपयांची तेजी आली असून भाव १६०० ते २४०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोती इतकी असून त्यात ५०० रूपयांची तेजी आली आहे. भाव १५०० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. पशुखाद्य तसेच दारू बनविण्यासाठी लागणारी काळी ज्वारीही बाजारात उपलब्ध असून त्याचा भाव १३०० ते १३२५ रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज २० ते ३० पोते इतकी असून ५० रूपयांची तेजी आल्यानंतर भाव ११५० ते १६०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक अत्यल्प असून १०० रूपयांची तेजी आल्यामुळे भाव १३०० ते १४०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक ५० पोते इतकी असून १०० रूपयांची वाढ झाल्यानंतर भाव ३८०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत, अश्ी माहिती अडत व्यापारी सुरेश लुणावत यांनी दिली. सर्व प्रकारच्या डाळी १०० ते ५०० रूपयांनी महागल्या आहेत. सध्याचा उत्पादन साठा कमी असल्यामुळे आणि पाऊस नसल्याने डाळींमध्ये तेजी आली आहे. हरभरा डाळा ३३०० ते ३६००, तूरडाळ - ६१०० ते ६९००, मुगदाळ - ८५०० ते ९०००, मसूरडाळ - ६२०० ते ६४०० असे भाव आहेत.किराणा मालात तेजीउपवासाला लागणाऱ्या किराणा मालातही १०० ते ५०० रूपयांची तेजी आली आहे. शेंगणदाण्याचे दर ५२०० ते ६५००, साबुदाणा ६५०० ते ७५००, भगर ५५०० ते ७५०० आणि पेंडखजुराचे दर ३००० ते ५५०० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत, अशी माहिती किराणा व्यापारी जितेंद्र गर्ग यांनी दिली.गुंटूरची लाल मिरची ५०० रूपयांनी महाली असून भाव ८००० ते ९००० रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. स्थानिक लाल मिरचीची आवक नगण्य आहे, अशी माहिती सुरेश भक्कड यांनी दिली.केंद्र सरकारने तंबाखूजन्य वस्तूंवर ज्यादा कर आकारल्याने सिगारेट, बिडी, तंबाखूचे दर वाढले आहेत. परंतु कोणत्या वस्तूवर किती कर वाढला याचा विस्तृत खुलासा न झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे.धान्य बाजारातही ग्राहकांना आकर्षित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्वारी मशीनद्वारे स्वच्छ करून तीस किलोच्या आकर्षक पॅकमध्ये काही व्यापारी विकत आहेत. आजच्या धावपळीच्या जमान्यात या नवीन उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.