पौर्णिमेनिमित्त कचनेर जैन मंदिरात अभिषेक
By Admin | Updated: May 15, 2014 00:26 IST2014-05-15T00:17:32+5:302014-05-15T00:26:03+5:30
कचनेर : वैशाख पौर्णिमेनिमित्त येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर महाभिषेक सोहळा उत्साहाने पार पडला.

पौर्णिमेनिमित्त कचनेर जैन मंदिरात अभिषेक
कचनेर : वैशाख पौर्णिमेनिमित्त येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर महाभिषेक सोहळा उत्साहाने पार पडला. सकाळी १०.३० वाजता बोलियाचा कार्यक्रम झाल्यानंतर इंद्र-इंद्रायणीच्या हस्ते भगवंतांना पंचामृत महाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्रायणीची बोली संजयकुमार झुंबरलाल कासलीवाल आडूळनिवासी यांनी घेतली. शांतीमंत्राची बोली दिलीपकुमार कैलासचंद बाकलीवाल (बडनगर), अर्चनाफलची बोली महावीरकुमार कैलासचंद बाकलीवाल (भोकरदन) यांनी घेतली. आमरस व दुग्धाभिषेकाची बोली रवींद्रकुमार राजमल पहाडे (कन्नड) यांनी घेतली. बोली घेणार्यांनी महाभिषेकात सहभाग नोंदविला. अभिषेकानंतर वैजापूरनिवासी सुभाषचंद, कैलासचंद, पारसकुमार बोहरा परिवारातर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. अतिशय क्षेत्रातर्फे भंडारादात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक आले होते. कार्यक्रमासाठी विश्वस्त माणिकचंद गंगवाल, सुरेश हुकूमचंद कासलीवाल, केशरीनाथ जैन, कार्यकारिणी अध्यक्षांसह त्यांचे सहकारी, प्राचार्य किरण मास्ट, जैन मंदिराचे कर्मचारी, पूजारी रामदास जैन आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)