शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:36 IST

या भीषण अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे.

करमाड : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील करमाड, सटाणा शिवारातून डीएमआयसीकडे जाताना वळण घेत असलेल्या कंटेनरला, जालन्याकडे जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कारमधील आदित्य शिवाजी धुपे (वय २१, रा. दावरगाव ता. अंबड, जि. जालना) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर नवनाथ धनंजय भिडे (वय ३५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्याकडून येऊन डीएमआयसीकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच ४३ वाय ६०६५) करमाड-सटाणा शिवारातील उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी असलेल्या दुभाजकाजवळ वळण घेत असताना, छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच २३ वाय २२८१) धडक दिली. या अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रताप नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेंद्राचार्य रुग्णवाहिका चालक बाळू कातखडे यांना बोलावून, जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात तेथील डॉक्टरांनी आदित्य धुपे यांना तपासून मयत घोषित केले. शिवाजी मदेवाड हे पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर