धुळे-सोलापूर महामार्गावर उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली; चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:53 IST2023-12-20T15:53:21+5:302023-12-20T15:53:48+5:30
अपघातग्रस्त कार कंटेनर खालून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

धुळे-सोलापूर महामार्गावर उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली; चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
- अमेय पाठक
छत्रपती सांभाजीनगर: धुळे- सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातील अंकुशनगर साखर कारखान्याजवळ उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. मृतात लहान मुलीचा समावेश असून अद्याप मृतांची ओळख पटली नाही. हा अपघात आज दुपारी दोन ते अडीज वाजेदरम्यान झाला.
आज दुपारी एक कार छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे निघाली होती. दरम्यान, अंकुशनगर सहकारी साखर कारखान्यासमोर एक कंटेनर उभा होता. याचवेळी भरधाव वेगातील कार कंटेनरवर धडकली. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघात एवढा भीषण होता की कार कंटेनरखाली दबले गेले आहे. मृतांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. कार बाहेर काढण्याचे काम जेसीबी मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त कार कंटेनर खालून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.