शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मेकॅनिकने २ हजारांसाठी चालकाला संपवले, मृतदेह लपवून त्याच्याच जीपने कुटुंबासह केले पर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:03 IST

खून केल्यानंतर चालकाची जीप घेऊन कुटुंबीयांसह केले पर्यटन

वाळूज महानगर ( औरंगाबाद) : अवघ्या २ हजार रुपयांसाठी रांजणगावच्या जीपचालकाचा खून करणारा आरोपी मेकॅनिक तौफिक शेख (रा. वाळूज) यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त केला.

रांजणगाव शेणपुंजी येथील सुधाकर पुंडलिक ससाणे (३५, रा. वाघोडा, ता. मंठा, जि. जालना) याचा त्याच्या ओळखीचा असलेला मेकॅनिक तौफिक शेख (२२, रा. वाळूज) याने २ हजार रुपयांवरून झालेल्या वादानंतर रविवारी (दि. १३) पंढरपुरात खून केला होता. खून केल्यानंतर तौफिकने पंढरपुरात तो काम करीत असलेल्या दुचाकी शोरूमच्या एका खोलीत मृतदेह लपविला व तो जीप घेऊन नातेवाइकांसोबत पयर्टनासाठी गेला होता. रविवारी रात्री परतल्यानंतर मृतदेह जीपमध्ये टाकून ती गरवारे कंपनीसमोरील निर्जनस्थळी उभी केली व तो पसार झाला होता. पोलीस तपासात मंगळवारी रात्री जीपमध्ये ससाणे याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत आरोपी मेकॅनिक तौफिक शेख याला त्याच्या वाळूजमधील घरी छापा मारून जेरबंद केले होते.

खुनासाठी वापरलेला रॉड जप्तजीपचालक सुधाकर ससाणे याचा खून करणाऱ्या आरोपी मेकॅनिक तौफिक शेख याला गुरुवारी वाळूज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन आरोपी तौफिक शेख याला २१ नोव्हेंबरपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, कॉन्स्टेबल किशोर साबळे यांनी आरोपी तौफिक काम करीत असलेल्या पंढरपूरच्या दुचाकी शोरूमची पाहणी करीत चौकशी केली होती. तेथील खोलीतून आरोपीने चालक ससाणे याच्या डोक्यात मारलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे.

चालकाकडे २ हजार रुपये बाकी होते तौफिक शेख पंढरपूरच्या दुचाकीच्या शोरूममध्ये मेकॅनिक आहे. सुधाकरशी जुनी ओळख असल्याने ते तौसिफकडे जीप वाॅशिंगसाठी येत होते. त्याचे २ हजार रुपये सुधाकरकडे बाकी होते. रविवारी यावरून दोघांत वाद झाला. तौफिकने सुधाकरच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. ते निपचित पडले. सुधाकरला तसेच शोरूमच्या लगत खोलीत टाकून बाहेरून कुलूप लावून तौफिक निघून गेला.

मृताची जीप घेऊन कुटुंबीयांसह पर्यटनखून केल्यानंतर तौफिक सुधाकरची जीप घेऊन वाळूजला घरी गेला. नंतर कुटुंबीयांसह तौफिक खुलताबाद व म्हैसमाळला गेला. रात्री पुन्हा पंढरपुरात शोरूमवर येऊन त्याने कुलूप उघडले असता सुधाकर मृत झाल्याचे दिसले. मध्यरात्री तौफिकने मृतदेह जीपमध्ये ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो ठिकठिकाणी जीप घेऊन फिरला. वाळूजच्या गरवारे कंपनीसमोरील निर्जन भागात जीप उभी करून तो घरी निघून गेला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी