शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

By सुमेध उघडे | Updated: October 14, 2024 12:13 IST

‘लोकमत’चे ऑनलाइन सर्वेक्षण : महिला शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइल वापरतात

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट मोबाइलचा वापर आता आधुनिक जीवनशैलीतील एक नैसर्गिक गरज बनली आहे. वायरलेस कॉलद्वारे कधीही आणि कुठेही एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या मोबाइलवरइंटरनेटच्या आगमनाने क्रांती झाली. विविध बँकिंग, शैक्षणिक, मनोरंजन, सोशल मीडिया ॲपने मोबाइलची स्क्रीन व्यापून गेली आहे. यामुळे अनेकांच्या हातातून फक्त झोपताना मोबाइल वेगळा होतो, अशा घराघरांत तक्रारी वाढत आहेत. मोबाइलच्या वाढत्या वापराबाबत ‘लोकमत’ने एक ऑनलाइन सर्वेक्षण केले, तेव्हा सोशल मीडियासाठीच मोबाइल अधिक वापरला जातो, असा निष्कर्ष उत्तरदात्यांच्या माहितीतून निघाला.

भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल वापरकर्त्यांचा देश आहे. डिजिटल क्रांतीने मोबाइलवर अनेक शासकीय, खासगी कामे घरी बसून करता येतात. मात्र, मोबाइलचा वाढता वापर चिंतेचे कारण बनले असून याचा अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. मोबाइलधारक नेमका कशासाठी अधिक मोबाइल वापरतात हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही सर्वांत जास्त मोबाइल कोणत्या कामासाठी वापरता? असा प्रश्न ‘लोकमत’कडून ऑनलाइन सर्वेक्षणात विचारण्यात आला. यात १२ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील १.२ टक्के, १९ वर्षे ते ३५ वर्षे- ३३.६ टक्के, ३६ वर्षे ते ५० वर्षे- ५१.९ टक्के, ५१ वर्षे ते पुढील वयोगटातील १३. ३ टक्के स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. एकूण उत्तरदात्यांमध्ये ६ टक्के स्त्री आणि ९४ टक्के पुरुष आहेत.

सोशल मीडियासाठीच अधिक होतोय वापरसाधारणपणे प्रत्येक मोबाइलवर गजेनुसार अनेक ॲप असतात. मात्र, तब्बल ३५.३ टक्के उत्तरदात्यांनी सोशल मीडियासाठी मोबाइलचा अधिक वापर करत असल्याचे उत्तर दिले. तर त्याखालोखाल २७.८ टक्के उत्तरदात्यांनी कॉल, तर २२ टक्के उत्तरदात्यांनी शैक्षणिक कामासाठी अधिक मोबाइल वापरतो असे सांगितले. फोटो/व्हिडीओ काढण्यासाठी २.१ टक्के, यूट्यूब पाहणे- २.९ टक्के, बँकेची कामे करण्यासाठी ४.१ टक्के, तर मनोरंजनासाठी मोबाइलचा वापर अधिक होतो अशा ५.८ टक्के उत्तरदात्यांनी सांगितले. एकंदरीत यूट्यूब आणि मनोरंजन ॲप हे सोशल मीडियाचा भाग असल्याने ही टक्केवारी एकत्रित ४४ टक्के होते. यावरून मोबाइलचा सर्वांत जास्त वापर सोशल मीडियासाठी होत असल्याचा निष्कर्ष उत्तरदात्यांनी दिलेल्या माहितीवरून निघतो. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी महिलांनी शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइलचा वापर होतो, असे सांगितले.

तुम्ही सर्वांत जास्त मोबाइल कोणत्या कामासाठी वापरता?कॉल : २७.८ टक्केसोशल मीडिया - ३५.३ टक्केफोटो/व्हिडीओ काढणे- २.१ टक्केबँकिंग- ४.१ टक्केयूट्यूब पाहणे- २.९ टक्केशैक्षणिक- २२ टक्केमनोरंजन- ५.८ टक्के

उत्तरदाते सुचवतात, तर इंटरनेट महाग करा, सर्वेक्षणात सहभागी उत्तरदात्यांनी काही सूचना देखील केल्या आहेत. त्या अशा :- सर्वांनी मोबाइलचा स्क्रीन टाइम कमी कसा होईल हे पाहावे.- २ जीबी इंटरनेट डेटा पॅकमुळे तरुण पिढी आळशी होत चालली आहे.- मोबाइल कामापुरताच वापरणे योग्य.- सोशल मीडियाचा वापर केवळ नवीन माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी असावा.- लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळावे.- मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय लावा.- रात्री दहा ते बारा यावेळी इंटरनेट बंद असायला पाहिजे.- नोकरी शोधण्यासाठी मोबाइलचा वापर करतो.- इंटरनेट महाग झालं पाहिजे, मोबाइलचा वापर कमी होईल.- शासनाने सर्व योजना, सुविधा मोबाइलवर द्याव्यात. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडियाMobileमोबाइलInternetइंटरनेट