चौका घाटात दोनदा आढळून आलेल्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:07 IST2024-01-15T13:07:08+5:302024-01-15T13:07:41+5:30
या जंगलात महिनाभरात दोन वेळा बिबट्या आढळून आला होता.

चौका घाटात दोनदा आढळून आलेल्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत अंत
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर -जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौका घाटात आज पहाटे 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलंडणाऱ्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत बिबट्याला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले असून आज दुपारी शवविच्छेदन केले जाणार आहे, अशी माहिती
विभागीय वन अधिकारी तौर यांनी दिली
चौका घाटाचा भाग हा छत्रपती संभाजीनगर तालुक्यात येतो.घाटाच्या परिसरामध्ये वन विभागाचे जंगल आहे. या जंगलात महिनाभरात दोन वेळा बिबट्या आढळून आला होता. त्याला पकडण्याचे प्रयत्न वन विभागाने केले पण ते यशस्वी झाले नव्हते. दरम्यान, सोमवारी पहाटे वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा अपघातात अंत झाला.