वैजापुरात चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:02 IST2022-11-23T11:59:00+5:302022-11-23T12:02:09+5:30
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

वैजापुरात चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग
वैजापुर ( औरंगाबाद) : शहरातील स्टेशन रोडवरील एका चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाने तत्काळ दाखल होत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
स्टेशन रोडवर चारचाकी गाड्यांच्या शोरूम आहे. आज सकाळी शोरूममधून धूर बाहेर येत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागास दिली. माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आगीत शोरूमचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शोरूम उघडण्यापूर्वीच आग लागल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शोरूममध्ये पाच ते सहा चारचाकी गाड्या विक्रीसाठी होत्या. तसेच टायर आणि गाड्यांमधील इतर अक्सेसरीज देखील मोठ्याप्रमाणावर होत्या. आगीत हे सर्व जाळून खाक झाल्याचा अंदाज आहे.