शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

घरकुलचे चार हजार ५०० कोटींचे कंत्राट अन् अशी झाली छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’ची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:07 IST

शहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत चार हजार ५०० कोटी रुपये होती.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत शहरात विविध ठिकाणी घरे बांधण्याचे काम ‘समरथ’ कन्स्ट्रक्शन कंपनीवर सोपविले होते. आर्थिक क्षमता नसताना चार हजार ५०० कोटींचे कंत्राट मिळविलेच कसे, या एका प्रश्नावर चौकशी सुरू झाली. चौकशीत एकाच आयपी ॲड्रेसवरून कंपनीने चक्क तीन निविदा भरल्याचे समोर आले. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी प्रवर्तन निदेशालय (ईडी)ची इन्ट्री झाली.

योजनेचा थोडक्यात इतिहास२०१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेचा शहरात श्रीगणेशा झाला. मनपाने लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले. ८० हजार नागरिकांनी अर्ज भरले. २०२२ पर्यंत मनपाला योजनेचा विसर पडला. महापालिकेने योजनेची अंमलबजावणी केली नाही, म्हणून खा. इम्तियाज जलील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्यात मनपाला आवास योजनेसाठी १२८ हेक्टर जमीन विविध भागात उपलब्ध करून दिली. ३१ मार्च २०२२ पूर्वी घरे बांधण्यासाठी कंत्राटदार निश्चित करणे बंधनकारक होते.

मनपाकडून निविदा प्रसिद्धमहापालिकेने घाईघाईत एक हजार घरांसाठी निविदा प्रसिद्ध केली. ‘समरथ’ कन्स्ट्रक्शन कंपनीने काम मिळविले. मनपाकडून जशी जमीन मिळत गेली तसे त्याच कंपनीला काम देण्यात आले. दरम्यान, समरथ कंपनीची आर्थिक क्षमता नसतानाही चार हजार ५०० कोटींचे काम देण्यात आले. हे काम कंपनीने रिंग करून मिळविल्याचे नंतर उघड झाले.

४६ पैकी ८८ लाख भरलेशहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत चार हजार ५०० कोटी रुपये होती. प्रकल्पाच्या तुलनेत एक टक्का बॅंक गॅरंटी म्हणजेच ४६ कोटी कंत्राटदाराने मनपाकडे भरणे अपेक्षित होते. त्याने फक्त ८८ लाख रुपये भरले. त्यामुळे मनपाने ‘समरथ’ कंपनीसोबत ॲग्रिमेंटच केले नव्हते. विशेष बाब म्हणजे प्रकल्पाचा आराखडाही कंपनीनेच तयार केला होता.

नगरविकासला दिली पूर्वकल्पनाआवास योजनेत समरथ कंपनीचा अनियमितपणा व गैरव्यवहार कसा उघड होतोय, याची इत्थंभूत माहिती मनपा प्रशासनाकडून नगरविकास विभागाला वेळोवेळी देण्यात आली होती. शासनस्तरावर एक चौकशी समिती गठीत करून सखोल चौकशी झाली. समितीच्या निष्कर्षानुसार समरथ कंपनीचे काम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका