देवगिरीतील व्याख्यानमालेत उज्ज्वल निकम, विजयअण्णा बोराडेंना ऐकण्याची संधी

By योगेश पायघन | Published: February 20, 2023 01:27 PM2023-02-20T13:27:52+5:302023-02-20T13:28:22+5:30

देवगिरी महाविद्यालयात उद्यापासून सुरु होणार फुले- शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला

A chance to hear Ujjwal Nikam, Vijayanna Borade in a lecture series in Devagiri college | देवगिरीतील व्याख्यानमालेत उज्ज्वल निकम, विजयअण्णा बोराडेंना ऐकण्याची संधी

देवगिरीतील व्याख्यानमालेत उज्ज्वल निकम, विजयअण्णा बोराडेंना ऐकण्याची संधी

googlenewsNext

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयात २२ २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी फुले- शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे  आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे ३२ वे वर्षे असल्याचे देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर आणि उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

समाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या पुरोगामी विचाराचा ज्ञानयज्ञात व्याख्यानमालेत पद्मश्री आप्पासाहेब पवार, प्रा. पुष्पा भावे, डॉ निर्मलकुमार फडकुले, कॉमेड गोविंद पानसरे, प्राचार्य ना. य. डोळे, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अभय बंग, डॉ. जनार्दन वाघमारे डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. यशवंत मनोहर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत, सुरेश द्वादशीवर, डॉ. श्रीकांत जिचका, ज्ञानेश महाराज, कुमार केतकर, प्राचार्य राम शेवाळकर खा. सिताराम येचुरी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, संपादक उत्तम कांबळे, निखिल वागळे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. प्रकाश आमटे.आदींची अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली आहेत.

बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, रायगड यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. ते जगणं सुंदर आहे या विषयावर पहिले पुष्प गुपणार आहेत. यावेळी विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे अध्यक्षस्थानी असतील. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता विधिज्ञ उज्वल निकम हे न्याय व्यवस्था व जनतेच्या अपेक्षा या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय मुंबईचे निवृत्त न्यायमूर्ती अमरजीत सिंग बग्गा हे असणार आहेत.

शुक्रवार सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते किशोर धमाले, हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर तिसरे पुष्प गुफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण विजयअण्णा बोराडे असणार आहेत. व्याख्यानमाला आ. सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. अपर्णा तावरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, प्रा. विजय नलावडे व संयोजन समितीचे डॉ. कैलास ठोबरे, डॉ. राजेश शेषम, प्रा. मीनाक्षी धुमाळ, प्रा. अजित घस, डॉ. राहुल साळवे, डॉ. विजय शिंदे, डॉ. बाबासाहेब निर्मळ, तंत्र सहाय्यक प्रा. गिरीश दुधगावकर व किशोर खंडागळे यांची उपस्थिती होती.

Web Title: A chance to hear Ujjwal Nikam, Vijayanna Borade in a lecture series in Devagiri college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.