५ वर्षांत ९८ जणांचे देहदान; घाटी रुग्णालय ऋणनिर्देश सोहळ्यात मानणार त्यांच्या कुटूंबियांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 10:39 IST2017-11-17T19:12:20+5:302017-11-18T10:39:39+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ९८ देहदान झाले.

५ वर्षांत ९८ जणांचे देहदान; घाटी रुग्णालय ऋणनिर्देश सोहळ्यात मानणार त्यांच्या कुटूंबियांचे आभार
औरंगाबाद : 'मरावे परी कीर्तीरुपी उरावे' या उक्तीप्रमाणे देहदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ९८ देहदान झाले.
एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो डॉक्टर घडत आहेत. विविध माध्यमातून होणा-या जनजागृतीमुळे देहदानात वाढ होत असून ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाºया व्यक्तींना मदत करण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. रासायनिक प्रक्रियेनंतर हे मृतदेह अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावत आहे.
पाच वर्षाच्या चिमुकल्याचे देहदान
मोठ्या व्यक्तींचे देहदान नियमित होतात. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते. गतवर्षी पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले.
कुटुंबियांचे ऋणनिर्देश
देहदानात वाढ झाली असून वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणा-यांच्या कुटुंबियांचा शरीररचनाशास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. १८) घाटी रुग्णालयात ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला आहे. यातून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात येईल.
-डॉ. शिवाजी सुक्रे,उपअधिष्ठाता तथाविभागप्रमुख,शरीररचनाशास्त्र, घाटी
वर्ष देहदान
२००६ २०
२००७ २८
२००८ २५
२००९ १४
२०१० १२
२०११ १४
२०१२ १२
२०१३ ११
२०१४ २०
२०१५ १८
२०१६ २७
२०१७ २२