शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कमल तलावावर होणार ९० लाख खर्च

By admin | Updated: June 22, 2014 00:51 IST

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक कमल तलावाच्या विकासासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक कमल तलावाच्या विकासासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या तलावाचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. तलावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील आमखास मैदानाशेजारी ऐतिहासिक कमल तलाव आहे. कधी काळी या तलावात कमळाची लाखो फुले होती. अलीकडील काळात या तलावात भराव टाकून अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात लोकमतने काही दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तलावाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या होत्या. तलावाची पाहणीसंजीव जयस्वाल यांनी स्वत: मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यासह बुधवारी या तलावाला भेट देऊन पाहणी केली. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी ९० लाख रुपयांचा खर्च लागेल. मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना जिल्हा नियोजन समितीतून हा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच या तलावात पुन्हा एकदा कमळ उमलण्याची शक्यता आहे. हा तलाव शासनाच्या मालकीचा आहे. त्यामुळे तो मनपा आणि जिल्हा प्रशासन अशा दोन्हींच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित केला जाणार आहे.