शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

७८ व्या वर्षीही करताहेत जनसेवा

By admin | Updated: July 1, 2014 01:06 IST

गंगाराम आढाव , जालना गरिबांच्या सेवेत अहोरात्र झटणारे डॉ. मो. बद्रोद्दीन यांनी जालन्यातील गरीबांचे डॉक्टर म्हणून जालना जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण मराठवाडा व विदर्भातही नावलौकिक केलेले आहे.

गंगाराम आढाव , जालनागरिबांच्या सेवेत अहोरात्र झटणारे डॉ. मो. बद्रोद्दीन यांनी जालन्यातील गरीबांचे डॉक्टर म्हणून जालना जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण मराठवाडा व विदर्भातही नावलौकिक केलेले आहे. जुन्या काळातील एम.बी. बी.एस असेलेले डॉ. बद्रोद्दीन अल्पदरात गोर गरीब रूग्णांना गेल्या ५४ वर्षांपासून सेवा देताहेत. ते आज वयाच्या ७८ व्या वर्षीही तरूण डॉक्टरांना लाजवेल, अशी सेवा देतात हे विशेष.डॉ. बद्रोद्दीन यांचा जन्म १९३६ मध्ये पैठण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण परभणी येथे झाले. १९६० साली एम.बी.बी.एस.चे शिक्षण उस्मानीया विद्यापीठ हैदराबाद येथे झाले. तेथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जालन्यातील मिशन हॉस्पिटल मध्ये १९६० ते १९६४ पर्यंत रूग्णसेवा केली. त्यांनतर त्यांनी जुना जालना भागात स्वत:चा दवाखाना टाकला. त्या काळात बोटावर मोजण्याइतकेच एम.बी.बी.एस डॉक्टर होते. अशा परिस्थितीत त्यांनी जालन्यातील रूग्णांना अत्यंत कमी शुल्क आकारून त्यांची सेवा केली. त्याबरोबरच अनेक गरीब वस्त्यामध्ये मोफत शिबिरे घेऊन सेवा केलेली आता.त्या काळी आतासारखे वेगवेगळ्या रोगांचे तज्ज्ञ असे वेगवगळे डॉक्टर नव्हते. एकाच डॉक्टराला सर्व रोगांवर निदान करावे लागत. जालना जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाडा व विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात सर्व रोगावर उपचार करण्यासाठी रूग्ण त्यांच्याकडे येतात.आज डॉ. बद्रोद्दीन हे वयाच्या ७८ व्या वर्षी ही जालन्यात सलग ८ ते १० तास दररोज रूग्णांची सेवा करतात. डॉक्टर डे विशेष...डॉ. बद्रोद्दीन यांनी जालन्यात गरीब रूग्णाच्या सेवे बरोबरच समाजीक , शैक्षणीक कार्यांत तसेच हिंदू- मुस्लीम एकात्मते साठीही त्यांचे मोठे कार्य आहे. जालन्यात त्यांनी दिवाळी मिलन, ईदमिलन सारखी प्रथा लागू केलेली आहे. ती आजही सुरू असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.