शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष घटक योजनेसाठी ७.६९ कोटींचा निधी

By admin | Updated: August 18, 2014 00:59 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख रुपयांचा

जालना : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी शेतीशी संबंधित विविध साहित्य खरेदी तसेच विहिरींसाठी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मागील २०१३-१४ मध्ये १ कोटी ६९ लाख ३३ हजार रुपयांची अतिरिक्त निधी रक्कम प्राप्त झाली होती. या रक्कमेसह २०१४-१५ या वर्षासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.मंजूर जमीन सुधारणा प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप, पीकसंरक्षण, शेतीची सुधारित औजारे बैलजोडी, रेडेजोडी, जुनी विहिर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग पाईपलाईन पंपसंच, नवीन विहिर शेततळे, पारसबाग कार्यक्रम, तुषार/ठिबक सिंचन संच पुरवठा ताडपत्री अशा चौदा घटकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सहाय्य देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १ लाख रुपये किंवा ५० हजार रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना लाभ देय आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविणे, पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना लाभ देण्यात येतो. गतवर्षी सदर योजनेसाठी १ हजार ५४ लाभार्थ्यांची निवड झाली होती.त्यातील ५९१ लाभार्थ्यांना विहीर तर ५०८ लाभार्थ्यांना इतर औजारांसाठी अनुदान देण्यात आले. ५ कोटी ९१ लाखांचा निधी खर्चित झाला. एकूण ८ कोटी ४५ लाखांचा लाभ देण्यासाठी वरील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. .या योजनेचा लाभ दोन वर्षांसाठी देता येत असल्याने गतवर्षी ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना यावर्षी लाभ मिळू शकणार आहे. मागील वर्षी ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यात कृती पूर्ततेमध्ये जे पात्र झाले, त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)