७९ पोलीस अधिका-यांना बदल्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:06 IST2019-02-14T00:06:24+5:302019-02-14T00:06:35+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक आणि ६७ पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

७९ पोलीस अधिका-यांना बदल्यांची प्रतीक्षा
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक आणि ६७ पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. एकाच जिल्ह्यात कार्यकारीपदावर तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाºया पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याअंतर्गत या बदल्या केल्या जाणार आहेत. यातील काही बदल्या बाहेरच्या जिल्ह्यात होतील, तर काही अधिकाºयांच्या बदल्या कार्यकारीपदावरून अकार्यकारीपदावर आयुक्तालयांतर्गत होतील.
याविषयी सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरू केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निवडणुकीपूर्वी पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यावर्षी मात्र बदल्यांचे अधिकार पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. शिवाय बदलीपात्र अधिकाºयांमध्ये प्रथमच सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे बदलीपात्र अधिकाºयांची संख्या ७९ पर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
सलग तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळापासून ठाणेदारपदी कार्यरत १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. याशिवाय २०१४ साली निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सेवा बजावलेल्या अधिकाºयांचीही बदली केली जाणार आहे. यातून अकार्यकारी शाखेत काम करणाºया अधिकाºयांना वगळण्यात आले आहे़ ७९ जणांच्या नावाची यादी तयार करून मुंबईला पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली आहे़ पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मान्यतेने या बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.