६७४ तीव्र कुपोषित बालके

By Admin | Updated: April 22, 2016 00:31 IST2016-04-22T00:25:32+5:302016-04-22T00:31:03+5:30

कंधार : फेब्रुवारी महिन्यातील अहवालानुसार अद्याप ६७४ तीव्र कुपोषित बालके आहेत़ लोकसहभागातूनच कुपोषणमुक्तीचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे़

674 acute malnourished children | ६७४ तीव्र कुपोषित बालके

६७४ तीव्र कुपोषित बालके

कंधार : फेब्रुवारी महिन्यातील अहवालानुसार अद्याप ६७४ तीव्र कुपोषित बालके आहेत़ लोकसहभागातूनच कुपोषणमुक्तीचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ कुपोषणमुक्तीचा पल्ला फार दूर दिसतो़
नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी लोकचळवळ उभारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला़ लोकप्रतिनिधींनी कुपोषित बालकांना दत्तक घेतले़ अनेक विभागाची सांगड घालत समन्वय साधून कुपोषण मुक्तीला गती देण्यात आली़ आॅक्टोबर २०१४ मध्ये ३०० बालके तीव्र कुपोषित होती़ अभियानाने एप्रिल २०१५ मध्ये अवघे १८८ बालके ही तीव्र कुपोषित राहिली़
जानेवारी २०१६ ची तीव्र कुपोषितांची संख्या ७३२ राहिली़ राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानांतर्गत टॉनिक, औषधे, आहारासाठी निधी मिळत होता़ व्हीसीडीसी अंतर्गत मुलांना दिवसभर एका महिन्यासाठी ६ वेळा आहार व औषध मिळत होते़ आता ते ब्रेक लागल्याने लोकसहभागाकडे वळण्याचा प्रसंग आला़ त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ५८ तीव्र कुपोषितांची संख्या कमी झाली़ परंतु अद्याप ६७४ बालके तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे़ मागील वर्षीचे व या वर्षीचे तीव्र कुपोषितात मोठी तफावत आढळून येते़ दहा विभागांतर्गत एकूण अंगणवाड्या ३२० आहेत़ आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी कुपोषणमुक्तीसाठी सूचना केली़ (वार्ताहर)

Web Title: 674 acute malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.