वीज कडाडली अन् 6 वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:47 IST2021-06-07T22:40:12+5:302021-06-07T22:47:41+5:30

रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. यामुळे इस्माईल शेख यांचे संपूर्ण कुटुंब घरीच होते.

6-year-old Chimukali dies of electrictiy of rain in aurangabad | वीज कडाडली अन् 6 वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

वीज कडाडली अन् 6 वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

औरंगाबाद : मुसळधार पाऊस सुरू असतांना अचानक वीज कडाडण्याच्या आवाजाने दारात उभी असलेली सहा वर्षाची चिमुकली घाबरून बेशुद्ध पडली आणि मरण पावली. ही घटना ६ जून रोजी रात्री ७:३० वाजता जिंसे परिसरातील तक्षशिलानगरात घडली. अक्सा इस्माईल शेख (रा. तक्षशिलानगर) असे मयत बालिकेचे नाव आहे. अक्साचे वडिल मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 

रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. यामुळे इस्माईल शेख यांचे संपूर्ण कुटुंब घरीच होते. रात्री ७:३० वाजेच्या सुमारास धो धो पाऊस पडत असतांना अक्सा दारात उभी राहून पाऊस पहात आणि घरातील नातेवाईकांना बोलत होती. यावेळी अचानक मोठा आवाजात वीज कडाडली. हा आवाज होताच दारात उभी असलेली अक्सा घाबरून बेशुद्ध पडली. यानंतर नातेवाईकानी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरू असतांना रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अक्साचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची जिसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. आज दुपारी तिचे शवविछेदन झाले असता तिच्या मृत्यूचे कारण राखीव ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्याचे पोलीस हवालदार पानकडे यांनी सांगितले.
 

Web Title: 6-year-old Chimukali dies of electrictiy of rain in aurangabad