शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

६ लाखांपैकी सापडला १८ हजारांचा ऐवज

By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST

चाकूर : येथील पोलिस ठाण्यातंर्गत गेल्या महिनाभरात ९ चोऱ्या झाल्या असून त्यातील केवळ ३ चोऱ्या उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़ या चोऱ्यांमध्ये ५ लाख ८० हजार ६७० रूपयांचा ऐवज लंपास झाला

चाकूर : येथील पोलिस ठाण्यातंर्गत गेल्या महिनाभरात ९ चोऱ्या झाल्या असून त्यातील केवळ ३ चोऱ्या उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़ या चोऱ्यांमध्ये ५ लाख ८० हजार ६७० रूपयांचा ऐवज लंपास झाला असून त्यातील १८ हजार १७० रूपयांचा ऐवज मिळाला आहे़ शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून तपास मंद गतीने होत आहे़ चाकूर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे़ गेल्या महिन्यात शहरातील आदर्श कॉलनीतील प्रा़ सिद्धेश्वर शेख यांच्या घरी चोरी होऊन सोन्याचे दागिने चोरीस गेले़ या दागिण्यांची किंमत ८७ हजार ५०० रूपये फिर्यादीत दाखविली़ परंतू, बाजार भावाने प्रा़ शेटकर यांचे दागिने ६ लाखांच्या जवळपास होते़ विशेष म्हणजे दुपारी चोरी झाली़ परंतु, याचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आले नाही़ तसेच घरणी येथील अनिल बोबडे यांचा १ लाख रूपये किंमतीचा आॅटो नळेगाव येथून चोरीस गेला़ आष्टामोडच्या पेट्रोलपंपावरून दोन टायर डिक्ससह चोरीस गेले़ तसेच चाकूर येथील राजू चव्हाण यांची १ सायकल अन्य साहित्याची चोरी झाली़ जानवळ येथून सौर उर्जेवर २ बॅटरी चोरीस गेल्या़ तर कबनसांगवी येथील धनाजी सांगवे यांच्या घरातून ९५ हजार रूपये चोरीस गेले़ कलकोटी येथील बालाजी मंदिरातून ‘श्री’चे दागिने असा ९ हजारांचा ऐवज चोरीस गेला़ या चोरींपैैकी केवळ १ सायकल व २ बॅटरी असा १८ हजार १७० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे़ विशेष दोन बॅटऱ्या ह्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत़(वार्ताहर)शहरासह तालुक्यातील चोऱ्यांच्या घटनांचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही़ परिणामी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे़ परंतु, पोलिसांनी अद्यापही गस्त वाढविली नाही़ या घटनांमुळे पोलिसांची निष्क्रियता समोर येत आहे़ याशिवाय, अवैैध वाहतूक, दारूची विक्री, चंदन तस्करीचे प्रकार वाढले आहेत़ पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या कडक आदेशाने मटका, जुगार बंद झाला़