शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात ५८ लाखांची विक्रमी वसुली

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

औरंगाबाद : दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींची कर वसुली थांबलेली होती. काल संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर वसुलीचे अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेने दिले.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींची कर वसुली थांबलेली होती. काल संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर वसुलीचे अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेने दिले. त्यानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ५८ लाख रुपयांची विक्रमी कर वसुली झाली. ३१ डिसेंबर रोजी कर वसुलीसंबंधी शासनाने अध्यादेश जारी केला. त्यानंतर मे-जूनपर्यंत ग्रामपंचायतींचा करनिर्धारणासाठी वेळ गेला. तथापि, तब्बल दोन वर्षे ग्रामपंचायतींची कर वसुली रखडली होती. त्यामुळे जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी २१ ते २६ जुलैदरम्यान तालुकानिहाय ग्रामपंचायतींची कर वसुली व अन्य कामांचा आढावा घेतला. यामध्ये कर वसुली न करणे, कराच्या वसुलीसाठी संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसा न बजावणे, १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाचे हिशेब सादर न करणे या इतर कामांमध्ये कसूर करणाऱ्या जवळपास १५ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले.दरम्यान, ग्रामपंचायतींनी कर वसुलीला शुभारंभ करावा म्हणून १ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हाभर एक दिवसाचे कर वसुली अभियान राबविण्यात आले. त्यास सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक दिवसाच्या या अभियानात औरंगाबाद तालुक्यात १५ लाख ४६ हजार रुपये, फुलंब्री तालुक्यात १ लाख ६५ हजार रुपये, सिल्लोड तालुक्यात १ लाख ७९ हजार रुपये, कन्नड तालुक्यात ५ लाख १० हजार रुपये, खुलताबाद तालुक्यात १ लाख ६ हजार रुपये, वैजापूर तालुक्यात १२ लाख ४३ हजार रुपये, गंगापूर तालुक्यात १२ लाख ७६ हजार रुपये, पैठण तालुक्यात ८ लाख ४२ हजार रुपये एवढी कर वसुली झाली. ४ग्रामविकास सचिवांच्या दालनात २८ जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कर वसुलीच्या मुद्यावर बैठक झाली. या बैठकीस प्रामुख्याने पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह एमआयडीसी हद्दीतील रांजणगाव- शेणपुंजी, जोगेश्वरी, वाळूज, घाणेगाव, वडगाव, वळदगाव या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते. ज्या ग्रामपंचायती एमआयडीसीच्या हद्दीत असतील, त्यांची कर वसुली एमआयडीसी करेल. त्यासाठी एमआयडीला मोबदला द्यावा लागेल, अशी चर्चा झाली. लवकरच यासंबंधी शासन निर्णय घेणार आहे.