शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

५०० रूपयांची लाच घेणारा तलाठी जेरबंद

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

भूम : शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या चिंचपूर सज्जाचे तलाठी हनुमंत भीमराव देडे

भूम : शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या चिंचपूर सज्जाचे तलाठी हनुमंत भीमराव देडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी भूम शहरात करण्यात आली़चिंचपूर ढगे येथील शेतकऱ्याने स्वत:च्या नावावर असलेल्या साडेदहा एकर जमिनीतील अडीच एकर शेती स्वत:च्या नावे व चार एकर शेती आईच्या नावाने अशी खातेफोड करून देण्याची मागणी तलाठी हनुमंत भीमराव देडे यांच्याकडे रितसर अर्ज देवून केली होती़ त्यावेळी तलाठी देडे यांनी शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५००० रूपयांची मागणी केली़ त्यानुसार तक्रारदार शेतकऱ्याने आर्थिक परिस्थिती नसतानाही ४५०० रूपये तलाठी देडे यांना दिले होते़ त्यानंतर पंधरा दिवसांनी तक्रारदाराने देडे यांच्याकडे कामाबाबत विचारणा केली असता उरलेले ५०० रूपये आणून दे, त्याशिवाय खातेफोड करून तसा उतारा देणार नाही, असे सांगितले़ त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे सहकारी पोनि आसिफ शेख, सपोफौ दिलीप भगत, पोना सुधीर डोरले, नितीन सुरवसे, बालाजी तोडकर, पोकॉ सचिन मोरे, चालक राजाराम चिखलीकर यांनी भूम येथे सापळा रचला़ त्यावेळी तलाठी देडे यांनी तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई केली. भूम ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)