५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:21 IST2020-10-08T12:20:30+5:302020-10-08T12:21:43+5:30

 ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला उस्मानपुरा पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार रमानगर येथे घडला.

5 year old girl tortured | ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

औरंगाबाद : ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला उस्मानपुरा पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत.  हा धक्कादायक प्रकार रमानगर येथे घडला.

कैलाश लक्ष्मण लोखंडे असे आरोपीचे नाव आहे. या बालिकेचे आईवडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात.  त्यामुळे ती हडको  येथे आजीकडे  राहत होती. लॉकडाऊनपासून ती रमानगर येथे आई- वडिलांकडे आली होती. आई- वडील दोघेही कामावर गेल्याची संधी साधून गेल्या काही दिवसांपासून या नराधमाने तिला चॉकलेट देऊन जवळीक निर्माण केली. 

या कालावधीत त्याने तिच्यासोबत सतत अश्लील चाळे केले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही सांगितला तर आई- वडिलांना  मारण्याची धमकी तो द्यायचा. मंगळवारी सायंकाळी बालिकेची आई कामावरून घरी आली असता तिने हा धक्कादायक प्रकार पाहिला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आढाव आणि दामिनी पाथकाच्या महिला पेालीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलीस बोलते केले व सगळा घटनाक्रम जाणून घेतला.  आरोपी लोखंडे याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार व प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: 5 year old girl tortured