शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार सेवानिवृत्तांना मिळणार वाढ

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर निवृत्तीवेतनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह इतर राज्य सरकारच्या सर्व ८० वर्षे किंवा त्यापुढील वय असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना ही वाढ लागू राहणार आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी एक रकमी रक्कम स्वीकारलेली आहे. निवृत्ती वेतनाच्या १/३ इतका अंशराशीकृत भाग पुन:स्थापित करण्यासाठी, अंशराशिकृत रकमेच्या सुधारणेसाठी सहाव्या वेतन आयोगप्रमाणे सुधारीत निवृत्ती वेतनास पात्र ठरले आहेत, अशा ८० वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनावर १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील पाच हजारावर निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा मिळेल अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. (वार्ताहर)