शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांमध्ये ४७३ जणांना एड्सचा विळखा

By admin | Updated: December 18, 2015 00:19 IST

औरंगाबाद : एप्रिल ते नोव्हेंबर या अवघ्या आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल ४७३ व्यक्तींना एड्स या महाभंयकर रोगाने विळखा घातल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : एप्रिल ते नोव्हेंबर या अवघ्या आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल ४७३ व्यक्तींना एड्स या महाभंयकर रोगाने विळखा घातल्याचे समोर आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीच्या बैठकीत ही माहिती समोर आली. एड्सला वेळीच आळा बसावा म्हणून शासन यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी बैठकीच्या अध्यक्षपदावरून अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केले. जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखाली असलेल्या २३ आयसीटीसी केंद्रात एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ४६,७९० सामान्य रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७३ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच ४९,२७० गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकीही १७ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर व पैठण आरोग्य केंद्र येथे एआरटी केंद्र असून, जिल्ह्यात एकूण १४,८०२ रुग्णांची एआरटी केंद्रांत नोंदणी झालेली आहे. ४,७०२ रुग्ण एआरटी केंद्रांत नियमितपणे औषधोपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेचा पात्र एचआयव्हीबाधित व्यक्तींना व देहविक्री करणाऱ्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भटकर, डॉ. आर.एन. देशमुख, डॉ. एन.जे. पाडळकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अंजली पाथ्रीकर, डॉ. विनायक मुंडे, डॉ. संजय देवरे, डॉ. संदीप भवरे, अशोक शिंदे, अप्पासाहेब उगले, ज्योती वाडेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार उपस्थित होते.