शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचारी बसून

By admin | Updated: August 20, 2015 00:19 IST

बीड : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी बीडच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी घेतले होते. मात्र, आता सदरील पाणी पुरवठा योजना

बीड : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी बीडच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी घेतले होते. मात्र, आता सदरील पाणी पुरवठा योजना लातूर महानगरपालिकेने चालविण्यास घेतली असल्याने बीडचे कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्ह्यात आले असल्याने ४५ कर्मचारी कामाविना बसून आहेत. हे कर्मचारी बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर घेण्याची मागणी होत आहे. जलसेवक, पंप आॅपरेटर, जोडारी, कारकून पदावरील ४५ कर्मचारी लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेवर प्रतिनियुक्त करण्यात आले होते. धनेगाव योजना बंद पडली तर लातूर शहराची पाणी पुरवठा योजना महानगर पालिकेने स्व:ताच्या ताब्यात घेतली. त्यामुळे बीड येथील एमजीपीचे ४५ कर्मचारी पुन्हा बीड जिल्ह्यात पाठविण्यात आले. या कर्मचाऱ्यांना अंबाजोगाई येथील एमजीपीच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली आहे. सद्यस्थितीला त्यांच्या हाताला काम नाही. काम असो किंवा नसो वेतन देणे बंधनकारक आहे.काय आहेत समस्या ?पाणी पुरवठा योजनेत पाईप लाईन तुटणे, जोडणे, पाणी सोडणे, फिटींग करणे अशी लहान-लहान परंतू महत्वाची कामे केली जातात. ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी योग्यरित्या करतात. त्यांना पंधरा ते वीस वर्षांचा अनुभव असतो. त्यामुळे न.प.च्या बॅक वॉटरच्या कामावर त्यांची नियुक्ती केल्यास लाभ होऊ शकतो. (प्रतिनिधी)बिंदुसरा धरण आटले असल्यामुळे माजलगाव धरणातून बीड शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. दोन्ही योजनेवर सध्या ७० कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. बिंदुसरा पाणीपुरवठा योजनेवर पाच ते सात कर्मचारी आहेत. तेथून ते काढता येत नाहीत. या शिवाय माजलगाव बॅक वाटरवर कार्यरत कर्मचारी कंत्राटी असून कामात नैपुण्य नाही. त्यामुळे बीडच्या जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी नगर परिषदेच्या योजनेवर कार्यान्वीत केले तर त्याचा साकारात्मक परिणाम दिसेल.