शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

४४ निमशिक्षकांची फरफट सुरूच !

By admin | Updated: September 3, 2014 01:06 IST

उस्मानाबाद : परंडा तालुक्यामध्ये नियमित पदमान्यतेच्या २३ जागा रिक्त असून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी व आठवीच्या वर्गावर २२ शिक्षकांची गरज आहे.

उस्मानाबाद : परंडा तालुक्यामध्ये नियमित पदमान्यतेच्या २३ जागा रिक्त असून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी व आठवीच्या वर्गावर २२ शिक्षकांची गरज आहे. असे असताना जिल्हा परिषदेकडून मात्र, संबंधित ४४ निमशिक्षकांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याने निमशिक्षकांची फरफट सुरूच आहे. शासनाच्या आदेशानंतर जिल्हाभरातील ८० ते८२ निमशिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन करण्यात आले. असे असले तरी आणखी ४४ निमशिक्षकांचे समायोजन करणे बाकी आहे. एकीकडे रिक्त जागा नाहीत, असे सांगितले जात आहे. वारंवार चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने संबंधित निमशिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आणि शिवसेनेचे सदस्य दत्तात्रय साळुंके यांच्याकडे धाव घेतली. यावेळी अनेकांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर साळुंके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची भेट घेवून या प्रश्नाबाबत चर्चा केली. तालुक्यामध्ये नव्याने पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अनेक ठिकाणी शिक्षकच नाहीत. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच नियमित पदमान्यतेच्याही २३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सदरील निमशिक्षकांना या ठिकाणी नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी सीईओंकडे केली. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक, शिक्षण समितीमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. परंतु, जिल्हा परिषदेकडून परंडा तालुक्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. वारंवार मागणी करूनही ती गांभीर्याने घेतली जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये जवळपास ४५ शिक्षकांची गरज आहे. निमशिक्षकही अतिरिक्त आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेकडून निमशिक्षकांच्या समयोजनाबाबत चालढकल का केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अन्यथा जिल्हा परिषदेत शाळा भरवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. सदरील निवेदन त्यांनी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांनाही दिले आहे.