शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलच्या खात्यावर ४४ कोटींचा निधी

By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला ४४ कोटी ६ हजार रुपयांचा निधी ९ तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला ४४ कोटी ६ हजार रुपयांचा निधी ९ तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.परभणी जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम हातचे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. पिकांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी निघाल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली. खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीपोटी अर्थसहाय्य म्हणून यापूर्वी १११ कोटी ४१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले होते. ही रक्कम प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाला ४४ कोटी ६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने या मदतीचे वाटप तहसीलस्तरावर केले आहे. त्या त्या तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येनुसार प्राप्त रक्कम तहसीलदारांच्या खात्यात जमा करण्यात आली असून तहसीलस्तरावरुन महसूलची यंत्रणा ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. जिंतूर तालुक्याला सर्वाधिक ९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून त्या खालोखाल परभणी तालुक्याला ८ कोटी ३२ लाख रुपये मिळाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील हे अनुदान असून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)