शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीवर ४४ कॅमेऱ्यांची करडी नजर

By admin | Updated: March 28, 2016 00:16 IST

लातूर : राज्यभरात एकाच दिवशी सुरु होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, लातूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ३१ जागांसाठी

लातूर : राज्यभरात एकाच दिवशी सुरु होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, लातूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ३१ जागांसाठी तब्बल तीन हजार १४१ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. ही पोलिस भरती मंगळवारपासून दोन टप्प्यात होणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.राज्यभरातील सर्वच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी ४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील रिक्त ३१ जागांसाठी तीन हजार १४१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ही प्रक्रिया येत्या मंगळवारपासून बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होत आहे. जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदासाठी ही भरती होत असून, फेब्रवारी महिन्यापासूनच या भरतीची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पोलिस शिपाई भरती पारदर्शक व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने २९ कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. तर अन्य १५ कॅमेरे भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मैदानांवरील प्रत्येक हालचालींवर या कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी किमान २ हजार २५० उमेदवार हे उच्चशिक्षित असून, बी. ए. च्या पुढे शिक्षण असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एम. ए, डी. एड, बी. एड, बी. पी. एड, आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. नोकरी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या उच्चशिक्षितांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता थेट अर्ज दाखल केले आहेत.