शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

३८४ ग्रामपंचायती पात्र

By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST

नांदेड: पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

नांदेड: पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.सन २०१०-११ या वर्षापासून पर्यावरण संतुलित समृद्ध योजना सुरु केली असून ग्रामपंचायतींना लोकसंख्यानिहाय तीन वर्षापर्यंत निधी मिळते. यासंदर्भात ठरवून दिलेले वृक्ष लागवड, निर्मल भारत अभियान, कर वसुली, प्रदुषण, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यशवंत पंचायतराज अभियान, अपारंपारिक उर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व ई-पंचायत आदी निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्याआधारे दरवर्षी २ ते १० लाख रुपयापर्यंत निधी दिला जातो. यात १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १० लाख व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्यांना १२ लाख दरवर्षी दिले जातात. ७००१ ते १० हजार लोकसंख्येपर्यंत ८ लाख, ५००१ ते ७ हजार लोकसंख्या ८ लाख, २००१ ते ५ हजार ४ लाख, १००१ ते २ हजार ३ लाख तर एक हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना दरवर्षी २ लाख रुपये निधी देण्यात येतो.उर्वरित शिल्लक ग्रामपंचायतीमधून २०१३-१४ साठी पात्र होऊ शकणाऱ्या ग्रामपंचायती अशा- पहिल्या वर्षासाठी २७५, दुसऱ्या वर्षासाठी १६४ तर तिसऱ्या वर्षासाठी ३४ अशा एकूण ४७३ ग्रामपंचायती असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमावाड यांनी सांगितले. एकूण पहिल्या वर्षासाठी ६२१ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत.एकूण ग्रामपंचायतीपैकी ६८८ ग्रामपंचायती या योजनेत पात्र होऊ शकल्या नाहीत. या योजनेतंर्गत विकासरत्न पुरस्कारासाठी नांदेड तालुक्यातील-बोंढार-नेरली, धर्माबाद-येताळा, लोहा-पळशी, झरी, कंधार-मजरे धर्मापूरी या पाच ग्रामपंचायतीचे विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती.पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे जिल्ह्यात एकूण १३०९ ग्रामपंचायती असून यापैकी पहिल्या वर्षासाठी ३४६, दुसऱ्या वर्षासाठी २७ तर तिसऱ्या वर्षासाठी ११ अशा मार्च २०१३ अखेर ३८४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत.यात नांदेड तालुक्यातील २९, अर्धापूर १९, मुदखेड २९, भोकर १६, उमरी ४६, हदगांव ३३, हिमायतनगर २१, किनवट ४, माहूर ९, नायगांव २३, बिलोली ९, धर्माबाद २१, मुखेड ४२, देगलूर २१, लोहा २१ तर कंधार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.