शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

३५० वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST

संजय कुलकर्णी , जालना शहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाशहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. येथील पाणवठे कोरडेच राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महिन्यातून दोनच वेळा वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.जालना शहरातील कन्हैय्यानगर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्रात असलेल्या या वनपरिक्षेत्रामध्ये मोर, हरीण, काळवीट, नीलगायी, ससे असे सुमारे ३५० प्राणी आहेत. गेल्या तीन-चार वर्षात ५ हेक्टर क्षेत्रात पर्यावरणप्रेमींसाठी वन उद्यान तयार करण्यात आले आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी या परिसरात असलेल्या दोन पाणवठ्यांपैकी एक पाणवठा नेहमीच कोरडा असतो. रविवारी सायंकाळी हा पाणवठा कोरडाच आढळून आला. तर दुसऱ्या पाणवठ्यात पाणी कमी प्रमाणात होते. सध्या उन्हाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचलेला असून उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी वनपरिक्षेत्रातील प्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून आले. या परिक्षेत्राच्या शेजारी असलेल्या काही शेतांमध्ये प्राणी पाण्याच्या शोधार्थ जात आहेत.वनपरिक्षेत्रात असलेल्या वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी दोन पाणवठे तयार केलेले आहेत. मागील तीन-चार वर्षात या क्षेत्रात एकूण ५० हेक्टरपैकी ५ हेक्टरमध्ये वनउद्यान तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी दररोज या ठिकाणी विरंगुळा म्हणून येतात. सकाळी व सायंकाळी जॉगींगसाठी नियमितपणे येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पाणवठे कोरडे असल्याचे पाहून काहीजण अधून-मधून टँकरने पाणी आणून तेथे टाकतात. मात्र हे काम वन विभागाकडून नियमितपणे होणे आवश्यक आहे. मोर, हरीण, काळवीट, नीलगायी यासारख्या वन्यप्राणांची संख्या या वनपरिक्षेत्रात अधिक आहे. पाणवठे अनेकवेळा कोरडे राहत असल्याने या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ परिसरातील शेतांमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे काही जणांनी सांगितले. पाण्यासाठी प्राण्यांची हेळसांड होत आहे.