शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

दंत महाविद्यालयांतील ३५ टक्के जागा रिक्त

By admin | Updated: October 6, 2014 00:44 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी २,५६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

बापू सोळुंके, औरंगाबादराज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी २,५६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. एमबीबीएसनंतर विद्यार्थ्यांचा कल दंत चिकित्साशास्त्र अभ्यासक्रमाकडे (बीडीएस) असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दंतचिकित्साशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी राज्यातील शासकीय आणि खाजगी दंत महाविद्यालयांतील बीडीएस प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या सुमारे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळावा, यासाठी दरवर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी सीईटी देतात. यावर्षी मे महिन्यात १ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. सीईटीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे राज्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. या गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना जात प्रवर्गनिहाय प्रवेश देण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. बहुतेक विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस आणि त्यानंतर आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग या क्रमाने अभ्यासक्रमाला पसंती देतात. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही ते बीडीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बीडीएस अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी पाठ फिरवीत असल्याचे दिसून येते. राज्यातील चार शासकीय दंत महाविद्यालयांत सुमारे साडेचारशे जागा आहेत. मात्र, यावर्षी राज्यातील सर्वच शासकीय दंत महाविद्यालयांतील सुमारे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गतवर्षीपर्यंत ४० विद्यार्थी क्षमता असलेल्या औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालयाची प्रवेश क्षमता यावर्षीपासून ५० करण्यात आली. गतवर्षी बीडीएस अभ्यासक्रमासाठी केवळ २३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षी अथक प्रयत्नानंतर प्रवेश क्षमता १० ने वाढली आहे. प्रवेश क्षमता ५० असूनही केवळ ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अशाच प्रकारे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयांची अवस्था आहे.