शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांना मिळणार प्रतिलिटर ३० पैैसे लाभांश

By admin | Updated: August 15, 2014 01:14 IST

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक अधिमंडळ बैठकीत दूध उत्पादकांना प्रती लिटर ३० पैैसे लाभांश देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक अधिमंडळ बैठकीत दूध उत्पादकांना प्रती लिटर ३० पैैसे लाभांश देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. येथील पाटीदार भवनात ही बैैठक संपन्न झाली. आ. डॉ. कल्याण काळे, संघाचे उपाध्यक्ष कचरू डिके, संचालक नंदलाल काळे, राजेंद्र जैैस्वाल, गोकुळसिंह राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, पुंडलिक काजे, आसाराम तळेकर, शीलाबाई कोळगे, बायसाबाई जाधव, व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. मागील वर्षीच्या सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन विविध ठरावास यावेळी मान्यता देण्यात आली. सभासदांना प्रती लिटर ६० पैैसे लाभांश देण्याची मागणी यावेळी आ. कल्याण काळे यांनी केली. सोबतच हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने चांगली कामगिरी केल्याचा गौरवही त्यांनी केला. अध्यक्षीय समारोप करताना हरिभाऊ बागडे म्हणाले, आम्ही संघाला तोट्यातून बाहेर काढून संघाची मालमत्ता उभी केली आहे; परंतु ६० पैैसे लाभांश वाटप करण्याएवढी संघाची आर्थिक ताकद नाही. आ. काळे हे राज्याच्या सत्तेत आहेत. गारपीट व दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी १० हजार रुपयांची मागणी आम्ही केली होती. सत्तेत असूनही ते पूर्ण करू शकले नाहीत. येथे ते सत्तेत नसल्यामुळे अवास्तव मागणी करीत आहेत. संघाला ६१ लाख ४० हजार रुपये नफा झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत सदस्यांना मदत करणे शक्य होईल. एक नजर या वर्षातील आकडेवारीवरदूध संकलन प्रति दिन (सरासरी)- ७३ हजार ३०४ लिटरदूध वितरण पॅकिंग प्रति दिन (सरासरी) ५० हजार ९७६ लिटरवर्षभरातील पशुखाद्य विक्री - १५८१ मे. टन.टँकरद्वारे प्रति दिन दूध वितरण - २२ हजार ४०४ लिटरनिव्वळ नफा - ६१ लाख ४० हजार