शेतकऱ्यांकडे ३ हजार कोटी बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:45 IST2018-08-07T00:44:22+5:302018-08-07T00:45:24+5:30
औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.

शेतकऱ्यांकडे ३ हजार कोटी बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.
यासंदर्भात औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. तरीही अनेक शेतकरी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
कृषिपंपांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविल्या जातात; पण अपेक्षित थकबाकी व वीज बिलांची वसुली होत नाही, तर दुसरीकडे वीज खरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, कर्मचाºयांवर महावितरणला खर्च करावा लागतो.
वीज खरेदीसाठी पूर्वीसारखी उधारीची परिस्थिती राहिलेली नाही. वेळच्या वेळी वीज खरेदीचे बिल महावितरणला चुकते करावे लागते.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कृषी संजीवनी ही व्याज व दंडाची ५० टक्के रक्कम माफ करणाºया योजनेला मुदतवाढ मिळते का, याकडे आमचे लक्ष आहे. सध्या केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा, आदी ग्राहकाचीे थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले असून, वीज चोरी व गळती रोखण्यावर भर आहे.
दोन जिल्ह्यांतील कृषिपंपांची सद्य:स्थिती
औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर मंडळ, औरंगाबाद ग्रामीण मंडळ आणि जालना मंडळाचा समावेश आहे. औरंगाबाद शहर मंडळामध्ये सध्या २ हजार १४२ कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू असून, त्यांच्याकडे १७ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या ४८५ एवढी असून, त्यांच्याकडे १ कोटी ९ लाख रुपये थकबाकी आहे.
औरंगाबाद ग्रामीण मंडळात वीजपुरवठा चालू असलेले २ लाख १५ हजार ४८४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १,६१९ कोटी २३ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषिपंपांची संख्या ७ हजार ८६८ एवढी असून, त्यांच्याकडे १३ कोटी ७७ लाख रुपये थकबाकी आहे.
जालना मंडळात सध्या वीजपुरवठा चालू असलेले १ लाख २३ हजार १७८ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १ हजार १२४ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले २ हजार १८७ कृषिपंप असून, त्यांच्याकडे ३ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या १० हजार ५४० एवढी असून, त्यांच्याकडे १७ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी आहे.