छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ४७५ दुबार मतदार; मतदानासाठी हमीपत्र बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:05 IST2026-01-24T13:04:36+5:302026-01-24T13:05:39+5:30

गंगापूर तालुक्यात सर्वाधिक गोंधळ; प्रशासनाने काढली यादी.

26 thousand 475 double voters in Chhatrapati Sambhajinagar district; Affidavit is mandatory for voting | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ४७५ दुबार मतदार; मतदानासाठी हमीपत्र बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ४७५ दुबार मतदार; मतदानासाठी हमीपत्र बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत असून, १८ लाख ७३ हजार ५३ मतदार पात्र आहेत. मतदारांमध्ये ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष, ८ लाख ९३ हजार ७७८ महिला, तर ४१ इतर मतदारांचा समावेश आहे. या मतदारांत २६ हजार ४५७ मतदारांची दुबार नोंदणी असल्याचे समोर आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची नावे चिन्हांकित केले आहे. तसेच दोनपैकी कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहेत, याबाबतचे हमीपत्र प्रशासनाला लिहून दिल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.

दुबार नावाची यादी प्रशासनाने तालुका प्रशासनाला पाठविली आहेत. तालुका पातळीवर बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन दुबार मतदारांची तपासणी केली. दुबार मतदार असल्याची यादी प्रत्येक तालुक्यात प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या ६३, तर पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जवळपास २ हजार २०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

मतदारांच्या नावासमोर दोन स्टार
ज्या मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले. त्यांच्या नावासमोर दोन स्टार हे चिन्ह टाकलेले असेल. प्रशासनाने दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदाराला एका ठिकाणचे नाव डिलीट करण्याचे आवाहन केले. मात्र, कुणीही नावे डिलीट केली नाहीत. हमी पत्रानंतरही मतदार दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदानास गेला, तर त्याच्याकडून पहिल्या ठिकाणी मतदान केलेे नसल्याचे शपथपत्र भरून घेतले जाईल.

तालुका............ दुबार मतदार
छत्रपती संभाजीनगर........ ४३१२
सोयगाव .............११०५
सिल्लोड ...........२७३५
कन्नड ..........४२४७
फुलंब्री.............. २२९१
खुलताबाद.............. १०७०
वैजापूर............. २७८९
गंगापूर ................५१५९
पैठण............ २७६७
एकूण ...............२६४७५

Web Title : संभाजीनगर में दोहरे मतदाता; मतदान के लिए हलफनामा अनिवार्य

Web Summary : संभाजीनगर जिले में आगामी चुनावों के लिए 26,000 से अधिक दोहरे मतदाता पाए गए। दोहरे पंजीकरण वाले मतदाताओं को मतदान के लिए हलफनामा जमा करना होगा। प्रशासन ने निष्पक्ष चुनाव सुनिश्चित करने के लिए दोहरी मतदाता सूचियों की पहचान की है।

Web Title : Duplicate Voters Found in Sambhajinagar; Affidavit Mandatory for Voting

Web Summary : Over 26,000 duplicate voters detected in Sambhajinagar district for upcoming elections. Voters with double registrations must submit an affidavit to be eligible to vote. Administration identifies and marks duplicate voter lists, ensuring fair elections.